कुरुंदवाड (प्रतिनिधी) : पाचवा मैल-घोसरवाड मार्गावर समोरुन येणार्या पिकअप गाडीने मोटरसायकलला धडक दिल्याने यावरील महिला जागीच ठार झाली. तर मोटरसायकलस्वार जखमी झाल्याची घटना काल (शनिवार) सायंकाळच्या सुमारास घडली. सुवर्णा सुनिल माळी (वय ४२) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर सुनिल माळी (वय ४८) हे जखमी झाले आहेत. हे दोघे हातकणंगले तालुक्यातील कोरोची इथले आहेत.
तर या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुसाप्पा कल्लाप्पा मजगे (रा. शिवनाकवाडी) याच्या विरोधात रात्री उशिरा कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद सागर बाळू माळी (रा. घोसरवाड) यांनी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात दिली आहे.