टोप (प्रतिनिधी) : उद्योग लहान किंवा मोठा असा फरक न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करा, असा सल्ला ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी दिला. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर (स्मॅक) च्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  ‘देशाची औद्योगिक वाटचाल आणि पुढील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. स्मॅकचे अध्यक्ष अतुल पाटील अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

कोल्हापूर फाऊंड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष सचिन पाटील, स्मॅक आयटीआयचे अध्यक्ष राजू पाटील, स्मॅकच्या फाऊंड्री अॅण्ड इंजिनीअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष नीरज झंवर, सेमिनार समितीचे प्रमुख अमर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी स्मॅकचे ज्येष्ठ संचालक व उद्योजक सुरेंद्र जैन, संचालक एम. वाय. पाटील, सोहन शिरगांवकर, भरत जाधव, रवी डोली, प्रशांत शेळके, शामबाबू तोतला, उद्योजक दीपक जाधव, अजय सप्रे, संजय भगत, प्रकाश जगदाळे आदीसह उद्योजक उपस्थित होते. अध्यक्ष अतुल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आभार मानले.

वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतरही आपल्या उद्योगात कार्यमग्न असणारे उद्योजक विश्वकर्मा फाऊंडर्सचे बाळासाहेब जाधव, ट्रीओ एंटरप्राईजेसचे पद्माकर सप्रे, महाराष्ट्र फोर्जचे आर. बी. थोरात, पिल्लई ग्रुपचे एन. एम. पिल्लई व सफल इंजिनियर्स अॅण्ड फॅब्रीकेटर्सचे राजाराम वागरे यांना सन्मानपत्र, राजर्षी शाहूचा पुतळा, शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.