मुंबई (प्रतिनिधी) : शुटिंगदरम्यान दुखापत झाल्याने बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर  अभिषेकचे वडील अभिनेते अमिताभ बच्चन आणि बहीण श्वेता बच्चन, अभिषेकची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. पण अभिषेकला नेमकी कोणती दुखापत झाली आहे? याबाबत काही समजू शकलेले नाही.

अभिषेक बच्चन याला चित्रीकरणादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे. अभिषेकला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन आणि श्वेता बच्चन त्याला पाहण्यासाठी लिलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून ‘पोन्नयिन सेलवन’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असणारी ऐश्वर्या राय बच्चन प्रायवेट जेटने मुंबईत तातडीने दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.