चंदगड (प्रतिनिधी) : रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) तसेच बांधकाम कामगार नोंदणी करण्याबाबतचे सर्व अधिकार लवकरात लवकर चंदगड नगरपंचायतीला मिळावे अशी मागणी नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अभिजित गुरबे यांनी पालकमंत्री ना. सतेज पाटील यांच्याकडे केली.

पालकमंत्री पाटील यांनी काल (रविवार) चंदगड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसोबत कोवाड येथे आढावा घेतला. या बैठकीत सभापती अभिजित गुरबे यांनी रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल योजना) तसेच बांधकाम कामगार नोंदणी करणेसंदर्भात असलेल्या समस्यांबाबत पालकमंत्री आणि आ. राजेश पाटील यांच्याशी चर्चा केली. तसेच या बाबतीत असणारे सर्व अधिकार नगरपंचायतीला त्वरित मिळावेत, अशी मागणी केली. या वेळी राजेंद्र परीट, कलीम मदर व सुधीर पिळणकर उपस्थित होते.