टोप ( प्रतिनिधी ) शिये गावच्या हद्दीत फुलेवाडीच्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कामावरुन परत येत असताना या युवकाने आत्महत्या केली असून. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबतचे सविस्तर वृत असे की, फुलेवाडी ता. करवीर येथील अभिजीत भोपळे वय ३२ हा युवक शिरोली एमआयडीसी येथे काम करत होता. रात्रपाळी आटोपून तो पहाटे चारच्या सुमारास तो मोटरसायकलवरून घरी जात असता, दरम्यान शिये रोडवर कुरण नावाचे शेत आहे. या शेतातील विहिरीजवळ अभिजीतने मोटरसायकल, अंगावरील जॅकेट, मोबाईल चप्पल काढून बाजूला ठेवत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

कामावरून सुटून फार वेळ झाला तरी, तो परत आला नसल्याने नातेवाईक वारंवार फोनवरुन संपर्क साधत होते, पण तो फोन घेत नसल्याने नातेवाईकांनी मोबाईलचे लोकेशन काढत घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्या ठिकाणी मोटरसायकल जॅकेट चप्पल मोबाइल आढळून आले, पण अभिजीत दिसून आला नाही. यावेळी अभिजीतची शोधाशोध केले असता, त्याचा मृतदेह विहिरीत तरंगत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी उपस्थितांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची वर्दी दिली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.

अभिजीतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाले असून आत्महत्याचे नेमकं कारण समजू शकलं नाही.