कोरोनाबाधित रुग्ण, नातेवाईकांसाठी ‘आप’ने सुरु केली हेल्पलाईन…

0
58

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यावेळी या कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आपने एक हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. आपच्या ७७१८८१२२०० या हेल्पलाईन नंबरवर फोन आल्यानंतर रुग्णांची सध्यस्थिती समजून त्यांना मदत केली जाणार आहे.

यामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड,  आयसियू बेडची उपलब्धता,  आपल्या जवळच्या कोव्हिड केअर सेंटरची माहिती आणि बेडची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता, अँम्बुलन्स उपलब्ध न झाल्यास रिक्षाची सोय करुन देणे,  प्लाझमाबाबत माहिती अशाप्रकारे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत केली जाणार आहे.

तरी आपल्या संबंधित कोणीही व्यक्ती कोरोनाबाधित झाल्यास आणि त्याला मदत हवी असल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. असे आवाहन आपच्या वतीने करण्यात आले आहे.