घरफाळा घोटाळ्याचे बाह्य ऑडिट करा, सगळं पुढं येईल : ‘आप’चा टोला

0
136

कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी खा. धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर पदाचा गैरवापर करून १० ते १५ कोटी रुपयांचा घरफाळा थकवल्याचा आरोप केला. तर पालकमंत्र्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांनी या आरोपांचे खंडन करूत महाडिक यांच्यावर पार्किंगमधले गाळे पाडून विकल्याचे आरोप केले. या आरोप-प्रत्यारोपामुळे घरफाळा घोटाळ्याची व्याप्ती अगदी नेत्यांच्या संस्थांपर्यंत गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या घोटाळ्याचे बाह्य लेखापरीक्षण (बाह्य ऑडिट) झाले पाहिजे, अशी मागणी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

घरफाळा घोटाळ्याचे बाह्य ऑडिट व्हावे ही मागणी आम्ही सातत्याने लावून धरली आहे. यासाठी वेळोवेळी यावर आंदोलने देखील केली आहेत. या घोटाळ्यामध्ये आता नेत्यांची नावे देखील समोर आल्यामुळे या मागणीला जोर धरत आहे. महापालिका प्रशासकांनी यावर त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ‘आप’ने दिला आहे.