वीज कनेक्शन तोडाल, तर जनताच हात कलम करेल..! : ‘आप’चा इशारा (व्हिडिओ)

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वीजबिल माफीसाठी सध्या राज्यांत विरोधी पक्ष आणि संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (शुक्रवार) दुपारी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात आम आदमी पार्टीच्या वतीनं वीजबिलात सवलत देण्याचे आश्वासन दिलेल्या शिवसेनेच्या फसव्या जाहीरनाम्याची होळी करण्यात आली.

 

 

या वेळी राज्य सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली. वीज कनेक्शन तोडण्यात आल्यास याद राखा जनताच तुमचे हात कलम करेल असा इशारा ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी दिलाय. आंदोलनात जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, युवाध्यक्ष उत्तम पाटील, संपदा मुळेकर, संतोष घाटगे, सूरज सुर्वे यांच्यासह ‘आप’चे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.