मुंबई (प्रतिनिधी) : आधारकार्ड, पॅनकार्ड जन्मतारखेचा वैध पुरावा नाही, तर शाळेच्या दाखल्यावरची जन्मतारीखच ग्राह्य मानण्यात येईल, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती रोहित राजन अग्रवाल यांनी हा निकाल दिला.

वय ठरवण्यासाठी शाळेच्या दाखल्यावरील जन्मतारीख ग्राह्य असेल, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एका दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी दरम्यान हा निकाल दिला आहे.

लग्नासंदर्भातील या याचिकेमध्ये अर्जदारांनी २८ फेब्रुवारी २०२१ रोजी आपण सज्ञान होतो, त्यामुळेच न्यायालयाने आमचा जगण्याचा आणि खासगी स्वांत्र्याच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी केली. तसेच इतर कोणीही आमच्या खासगी वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करु नये, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.