कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनासह आरोग्य विषयक आणि प्रशासकीय कामकाजात नागरिकांसाठी काँग्रेसच्या माध्यमातून मदत कक्ष सुरू केले आहे. तरी नागरीकांनी कोणत्याही कामासाठी मोबाईलवरून संपर्क साधावा, असे आवाहन आ. चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. शहरात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशानसनाच्यावतीने उपचार आणि मदतकार्य सुरू आहे. याचबरोबर कोरोनासह आरोग्य विषयक आणि प्रशासकीय कामकाजातील कार्यालयीन अडचणी दूर करण्यासाठी आ. जाधव यांनी मदत कक्ष सुरू केले आहे. नागरिकांच्या अडचणींचे निराकरण तातडीने केले जावे आणि त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आ. जाधव यांनी स्वत:ची स्वतंत्र टीम सक्रिय केली आहे. ही टीम मोबाईलद्वारे नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जुलै ते आक्टोंबर २०२० या काळात मदत कक्ष सुरू होते. या काळात रुग्णांना वैद्यकीय मदत, बेड उपलब्ध करून देण्यासह सर्व प्रकारचे सहाय्य नागरिकांना मदत कक्षातून झाले होते. कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने हे मदत कक्ष पुन्हा सुरू केल्याचे आ. जाधव यांनी सांगितले.

तसेच मदत कक्ष : संपर्क व्यक्ती आणि मोबाईल क्रमांक असे

रोहित पाटील-९५२७३७६४२९, उदय जाधव-९३७११०५४५३, युवराज उलपे- ९४२२६८३९४९, युवराज पाटील- ९८८१७१३९१२

या नंबरवर नागरिकांनी कोरोनासह अन्य आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारची मदत तसेच प्रशासकीय कामकाजातील अडथळे दूर करण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन आ. जाधव यांनी केले आहे.