चुये येथील तरुण-तरुणीची विष प्राशन करून आत्महत्या

0
318

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील चुये इथल्या तरुण-तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत पाटील आणि सानिका व्हनाळकर अशी त्यांची नावे आहेत. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे.

अनिकेत पाटील याने राहत्या घरी तर सानिका व्हनाळकर हिने कोल्हापुरातील आर. के नगर इथल्या घरी विष प्राशन केलं होतं. मंगळवारी अनिकेतचा तर आज (बुधवार) उपचारादरम्यान सानिकाचा मृत्यू झाला. एकाच दिवशी एकाच गावातील दोघांनी आत्महत्या केल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.