पन्हाळा येथील मृणाल बारमधील कामगाराने पळवले ८ लाख ८८ हजार…

0
737

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील हॉटेल मृणाल बारमधील कामगार  दत्तात्रेय प्रल्हाद ढमाळ (रा. आसवली ता. वाई. जि. सातारा) सध्या (रा. पन्हाळा) याने काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास हॉटेलमधील तिजोरीच्या चाव्याने सुमारे ८ लाख ८८ हजार रोकड आणि लॅब्रो जातीचा कुत्रा लंपास करून पसार झाला.

आज (गुरुवार) हा प्रकार उघडकीस आला. यावेळी हॉटेलचे मॅनेजर दत्ता सातपुते आणि बारचे मालक प्रशांत सावंत यांना हॉटेलमध्ये पैशांची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या घटनेची माहिती पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये देऊन दत्तात्रेय ढमाळ याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

तर पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.