कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे ता. करवीर येथील एका महिलेने सावकाराकडून कर्ज घेतले होते. याची वसुली करताना पैसे द्या अन्य़था या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडू, अशी धमकी सावकाराने दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच या महिलेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर शहराला लागूनच असलेल्या वडणगे ता. करवीर येथील महिलेला कर्जाच्या बदल्यात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडू, अशी धमकी सावकाराने दिल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घर बांधण्यासाठी घेतलेल्या 25 लाख रुपयांच्या बदल्यात सावकाराने 85 लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे द्या, अन्यथा वेश्या व्यवसाय करायला भाग पडू, अशी धमकी दिली आहे. याबाबत महिलेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला माहिती देत असून दुसरी महिला ( नात्याने जाऊ ) देखील दिसत आहे.
महिलेने दिलेल्या माहितीनुसार, दररोज तिच्या घरामध्ये 10 ते 12 गुंड येत तीला धमकी देतात मात्र, पोलीस तक्रार घेण्यास तयार नाहीत. तसेच याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. असे त्या महिलेने म्हटलं आहे. या प्रकरणात गावच्या सरपंचांनी देखील कोणतीही भूमिका न घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे. तसेच पोलिस सावकारांबाबतची तक्रार घेण्यास टाळाटाळ का करत आहे ? याचं उत्तर मिळालेले नसुन वसुलीतील काही भाग पोलिसांना पोहोच होतो का ? असा सवाल ही स्थानिक करु लागले आहेत.