कोल्हापूर (प्रतिनिधी) : कावळा नाका ते सर्किट हाऊस रस्त्यावर धैर्यप्रसाद हॉलजवळ आज (बुधवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे झाड कोसळले. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. यावेळी सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. कावळा नाका अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी येऊन झाड बाजूला केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.