आळतेजवळ स्कोडा कार ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घुसली  

0
80

हातकणंगले (प्रतिनिधी) :  हातकणंगले – वडगाव रस्त्यावर भरधाव स्कोडा कार  ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये घुसली. हा अपघात सोमवारी  रात्री ११ वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हातकणंगले – वडगाव रस्त्यावरील आळते गावाजवळील शेळके मळ्याजवळ ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली वडगावहून हातकणंगलेकडे जात होती. यावेळी भरधाव  स्कोडा कारने ट्रॉलीला जोराची धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  परंतु यात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.