इचलकरंजीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप माणगावकर यांचे निधन

0
297

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप गोपाळराव माणगांवकर यांचे आज (सोमवार) निधन झाले. त्यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.

माणगावकर हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून परिचित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ते बालपणापासून कार्यरत होते. विश्‍व हिंदू परिषदेचे शहरमंत्री म्हणून काम केले आहे. विविध आंदोलनात त्यांना अटक तसेच कारावासही भोगावा लागला. माहिती अधिकाराचा प्रचार होण्यासाठी त्यांनी व्याख्याने दिली होती.  माहिती अधिकार्‍याच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे त्यांनी काम केले. त्यांनी नगरपालिकेतील विविध खात्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणला. त्यांनी अनेक सामाजिक कार्यकर्ते घडविण्याचेही काम केले आहे. त्यांच्या पश्चात  आई, पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शहरातील विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.