कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे पत्र्याच्या बंद खोलीमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कुरुंदवाड पोलिसांनी छापा टाकून १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवनाकवाडी येथील बाबासो गावडे यांच्या गट नं ३६० मधील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी रोख रक्कम १२ हजार १८०, ६७ हजार रुपये किमतीचे ५ मोबाईल, ४५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी असा १ लाख २४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून बाबासो गावडे, जोतिराम संकपाळ, सूरज कुरणे, शशिकांत मगदूम, रामचंद्र वाघे, विशाल कांबळे यांच्यावर कुरुंवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कुरुंदवाडचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी भांगे, पोलीस नाईक प्रकाश हंकारे, पोलीस अंमलदार सागर खाडे, बाबाजी दराडे यांनी केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक साबळे करीत आहेत.