आरएसएसच्या नेत्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपाताचा डाव

0
65

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने इसिस या दहशतवादी संघटनेच्या कटाची माहिती उघड केली आहे. कोरोना जिहादच्या नावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांना टार्गेट करणे आणि त्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन घातपात करण्याचा आयएसआयएसचा डाव होता. ही खळबळजनक माहिती एनआयएने स्थानिक कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात दिली आहे.

इस्लामिक स्टेट खोरासन प्रांतच्या अटक केलेल्या पाच दहशतवाद्यांकडे एनआयएने तपास केला असता, ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एनआयएने आपल्या आरोपपत्रात या सर्व माहितीचा समावेश केला आहे. हे ५ दहशतवादी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या आडून भारत सरकारविरोधात मुस्लिमांना भडकावण्याचा कट रचत होते. एनआयएने सप्टेंबरमध्ये स्थानिक न्यायालयात एक आरोपपत्र सादर केले होते. त्या आरोपपत्रात कोरोना जिहादच्या माध्यमातून सादिया आणि डॉ. इश्फाक हे अटकेतील दहशतवादी देशात दहशत निर्माण करण्याचा कट रचत होते.