राजाराम तलावाजवळ महिलेचा अर्धवट मृतदेह आढळला

0
100

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महिलेचा खून करून तिचा अर्धवट मृतदेह राजाराम तलावात फेकून दिल्याचा प्रकार आज ( बुधवारी) सकाळी उघडकीस आला आहे. एका पिशवीत मृतदेह असल्याचे फिरायला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. याची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम तलाव परिसरात सकाळी नागरिक फिरण्यासाठी  आले होते. त्यांना एका पिशवीत मृतदेहाचे अवशेष असल्याचे आढळून आले. त्यांनी  पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर  पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. ही महिला अंदाजे ६० वर्षे वयाची असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.