यड्रावचा इसम पंचगंगेत बुडाला…

0
224

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे पंचगंगा नदीमध्ये पोहत असताना एक मध्यमवयीन इसम बुडाला. रवींद्र पांडुरंग शिंदे (वय ४८, रा. राजीव गांधीनगर, यड्राव) असे त्याचे इसमाचे नाव आहे. हा प्रकार आज (शुक्रवारी) सकाळी घडला. 

शिंदे हे आज सकाळी कुटुंबीयांसोबत पंचगंगा नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेले होते. या वेळी ते पोहण्यासाठी नदीमध्ये उतरले. मात्र काही वेळाने धाप लागल्याने गटांगळ्या खाऊ लागले. तेथे असलेल्या घरच्यांनी हा प्रकार पाहून आरडाओरडा सुरू केला. त्या वेळी नदीकाठी असलेले काही युवक त्यांच्या मदतीला धावून आले, पण रवींद्र हे नदीच्या मध्यापर्यंत पोहत गेले होते. मदतीला गेलेले युवक त्यांंच्याजवळ पोहचेपर्यंत ते बुडाले.

याची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व स्थानिक पाणबुड्यांच्या साहाय्याने रवींद्रचा शोध सुरू आहे. मात्र, संध्याकाळी ७ पर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.