शरद पवारांच्या मामाच्या गावातील शेतकऱ्याला हवाय मदतीचा हात

0
3380

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या आजोळी म्हणजे गोलिवडे (ता. पन्हाळा)  येथील शेतकरी कुटुंबातील प्रभुनाथ पांडुरंग गुरव यांच्या मानेवर वैरणीचा भारा पडल्याने मानेला गंभीर दुखापत  झाली. त्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू  आहेत. त्याच्या  ऑपरेशनसाठी ५ ते ६ लाखांचा खर्च येणार आहे.  परंतु प्रभुनाथ गुरव यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. घरातील कर्ता पुरुष  हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांचे कुटुंब आर्थिक  गर्तेत अडकले आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती,  सामाजिक संस्थांनी पुढे येऊन गुरव कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे  आवाहन सदगुरु श्री योगी प्रभुनाथ महाराज फौंडेशन आणि गुरव कुटुंबियांनी केले आहे.

फौंडेशनच्या वतीने गावातून ८० ते ९० हजार रुपयांचा मदतनिधी गोळा करण्यात आला असून ऑपरेशनसाठी आणखी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मामाचं गाव  म्हणून ओळख मिळाली.  याच गावातील प्रभुनाथ गुरव  अल्पभूधारक शेतकरी  आहेत. ते खासगी काम करून आई-वडील, पत्नी, लहान मुलांचा सांभाळ करत कुटुंब चालवतात.  अगोदरच कोरोनामुळे आर्थिक संकट असताना  काही दिवसांपूर्वी प्रभुनाथच्या मानेवर वैरणीचा भार पडून जोराचा मार लागला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात अॅडमीट केले.

दरम्यान, लवकरात लवकर त्यांची सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी ५ ते ६ लाख रुपये खर्च येणार आहे. एकीकडे घरची हलाखीची परिस्थिती तर दुसरीकडे घरातील कर्ता पुरुष रुग्णालयात उपचार घेतोयं. त्यामुळे गुरव कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून ६ लाखांची जोडणी कुठून करणार ? असा प्रश्न गोलिवडे ग्रामस्थांना पडलाय. सदगुरु श्री योगी प्रभुनाथ महाराज फौंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गावातून ९० हजारांच्या आसपास मदतनिधी गोळा कोला आहे. मात्र, हा मदतनिधी फार तोकडा आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी आता पुढे येवून या गुरव कुटुंबीयांना आर्थिक मदत करणे गरजेचं आहे. याबद्दल फौंडेशनच्या वतीने समाजातील दानशूरांनी आर्थिक मदत करुन गुरव कुटुंबीयांना दिलासा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी संपर्क

उत्तम बाबूराव गुरव

गुगल पे व फोन पे  नंबर 9637221296.

Union Bank of India

A/C–321402010113007

SC CODE-UBIN0532142.