पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त अमल महाडिक यांच्याकडून मदतीचा हात…

0
100

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना विरुद्धच्या लढाईत आपले नेतृत्व कौशल्य दाखवत देशाला यातून सुरक्षित ठेवण्यासाठी अखंड प्रयत्नरत असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज (शुक्रवार) कोरोना लसीकरणासाठी १०,००० सिरिंज आणि १०,००० पॅरासीटामोल टॅब्लेट्स माजी आ. अमल महाडिक यांनी आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्त केल्या.

अमल महाडिक म्हणाले की, कोरोनाला हरवण्यासाठी सर्व नागरिक आणि संपूर्ण आरोग्य व्यवस्था कसोशीने प्रयत्न करीत आहे. मात्र, आरोग्य सेवा पुरवत असताना अनेकवेळा सिरींज आणि औषधांचा तुटवडा निर्माण होत आहे. आरोग्य व्यवस्था कणखर आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही मदत करीत असल्याचे माजी आ. अमल महाडिक यांनी सांगितले.

यावेळी प्रा.आ.केंद्र गडमुडशिंगीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रिझवाना मुल्ला, डॉ. शैलेश पाटील, आरोग्यसेविका संध्या महाजन, गांधीनगरच्या पं. स. सदस्या सरिता कटेजा, गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, उपसरपंच तानाजी पाटील, वळीवडे सरपंच अनिल पंढरे, चिंचवाडचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, उपसरपंच महेश जोंधळेकर, वसगडे, सांगवडे, चिंचवाड, सांगवडेवाडी, नेर्ली, तामगाव, वळीवडे, उचगाव, गांधीनगर, गडमुडशिंगी गावांचे ग्रा.पं. सदस्य, नागरिक उपस्थित होते.