जिल्ह्यात महापूरसदृश परिस्थिती : ‘एनडीआरएफ’ची २ पथके कोल्हापुरात दाखल

0
195

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक नद्या पात्राबाहेर पडल्या आहेत. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून दुपारी चारच्या धोक्याच्या पातळी गाठली आहे. २००५ आणि २०१९ सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज (गुरुवार) दुपारी ३ च्या सुमारास ‘एनडीआरएफ’ची २ पथके कोल्हापूर जिल्ह्यात दाखल झाली आहेत. एक पथक शिरोळ तालुक्यात तर दुसरे पथक कोल्हापूर येथे दाखल झाले आहे.