सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 500 रुपयांचा दंड

0
43

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम शहरात प्रभावीपणे राबविली जात आहे. आज आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वत: एका व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल 500 रुपये दंडाची कारवाई केली.

पंचगंगा हॉ‍स्पिटल रोड वरील केदारलिंग बेकरी जवळ रसूल भालदार या व्यक्तीस रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याचे आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेच्या पथकामार्फत आयुक्तांनी रसूल भालदार यांनी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे आवाहनही त्यांनी शहरवासियांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here