टोप (प्रतिनिधी) : मनपाडळेनजीकचा सादळे-मादळे हा डोंगर भाग जंगली झाडे व झुडपांनी वेढला गेला आहे. आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास मनपाडळे परिसरातून वणवा पेटला. काही क्षणातच सादळे-मादळे डोंगर परिसरात वणवा पसरला. यामध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे गवत व दहा ते पंधरा हेक्टर डोंगर परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली.

या वणव्यात नैसर्गिक साधन संपत्ती, जैवविविधता छोटे-मोठे वृक्ष यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. डोंगराळ परिसरातील काही ठिकाणी गवत कापले न गेल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरत गेली. ही आग सादळे येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाला लागू नये या गावातील तरुण वर्ग आग विझवण्यासाठी रात्री उशीरा प्रर्यत प्रयत्न करत आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.