दक्षिण कोरिया (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरीयामध्ये  हॅलोविन पार्टीदरम्यान  झालेल्या चेंगराचेंगरीत १५१ जण मृत्यूमुखी पडले आहेत. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ५० हून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका आला होता. तर अनेक लोक रस्त्यावर पडलेले दिसत होते.

काल (शनिवार) रात्री इटावॉन लेजर जिल्ह्यात हॅलोवीन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यानंतर चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमी झाल्याले. यातील ५० जणांना हृदयविकाराचा झटका आला होता. ही घटना घडली त्यावेळी ४ मीटर रुंद रस्त्यावर एक लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. यानंतर अचानक घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली आणि ही दुर्घटना घडली.