कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अभिजित उर्फ पप्या सुभाष नाडगोंड (वय ३५) याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान संशयित आरोपी नाडगोंड याला अटक केली असून संतप्त ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिल्याने सांगली येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सोमवारी दुपारी पीडित मुलगी दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली असता संशयित आरोपी नाडगोंडा याने आणखीन खाऊ देण्याचे आमिष दाखवून पीडित मुलीस दुकानात बोलवून अतिप्रसंग केला. पीडित मुलगी रडत घरी जाऊन तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर गावातील संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपी नाडगोंडा याला चांगलाच चोप देऊन त्याच्या दुकानाची तोडफोड केली. त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. उपचारानंतर त्याला न्यायालयात उभे करणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले.