गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी येथे एका विवाहितेचे स्नान करताना चोरुन मोबाईलवर चित्रीकरण करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. पवन हरिबा जाधव (रा. करंबळी, ता. गडहिंग्लज) असे त्याचे नाव आहे. ही घटना (दि. १४) रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन हा संबधित विवाहितेच्या घराशेजारी रहायला आहे. गुरुवारी ती विवाहिता पहिल्या मजल्यावरील बाथरूममध्ये स्नान करण्यास गेली होती. त्यावेळी वरच्या बाजूने पवन हा मोबाईल आत घालून चित्रीकरण करत होता. या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने याबाबत कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी गडहिंग्लज पोलिसात पवन याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.