कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथे  बेकायदा मद्याचा साठा जवळ बाळगल्याबद्दल रात्री उशिरा दत्तात्रय पाटील (वय ५३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल प्रमोद पाटील यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.      

कळे-मासुर्ली मार्गावर सावर्डे गावच्या हद्दीत एका शेतात सुरेश पाटील याची बिअर शॉपी आहे. लॉकडाऊनमुळे शॉपी बंद असल्याने त्याने आपल्या भोसले गल्लीतील राहत्या घरात मद्याचा साठा करून ठेवला होता. काल (गुरुवार) सायंकाळी सहाच्या सुमारास घराच्या पाठीमागील बाजूस तो उघडयावर दारू विक्री करत होता. त्याच्याकडे १७ हजार ४७२ किंमतीच्या देशी दारुच्या सात बॉक्समध्ये एकूण ३३६ बाटल्या आढळून आल्या.