बंदी आदेश झुगारून पाडळी खुर्द येथे खुलेआम रस्सा पार्टी : आठजणांवर गुन्हा

0
78

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बंदी आदेश लागू असताना पाडळी खुर्द (ता. करवीर) येथे वाढदिवसानिमित्त उघड्यावर केक कापून रस्सा पार्टी आयोजित केल्याप्रकरणी आठजणांविरोधात आज (मंगळवारी) करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजू सोनबा बोडके, ऋषिकेश रविंद्र नलवडे, इजमाम हनीस हेरवाडे, मयूर शिवाजी घाडगे (चौघेही रा. लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर), निलेश धाकूल फोंडे (रा. राधानगरी), आदित्य राहूल भोजणे (रा. मिरज), भूषण संजय पोतदार (रा. माणगाव, ता.राधानगरी), किरण नामदेव नरतवडेकर (रा. गंगापूर ता. भुदरगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे एकत्र येऊन कार्यक्रम, पार्टी करण्यास मनाई आहे. मात्र पाडळी खुर्द येथे ८ ऑगस्ट रोजी सोनबा बोडके यांच्या गोठ्याशेजारी संशयितांनी वाढदिवसानिमित्त उघड्यावर केक कापून रस्सा पार्टी केली. याबद्दल त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.