पुनाळ येथे रस्त्यावर गाडी आडवी लावल्याबद्दल गुन्हा दाखल…

0
501

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील मधुकर शंकर चौगले- हुजरे (वय ६३) यांच्यावर आज (रविवार) दुपारी मुख्य रस्त्यावर बोलेरो गाडी आडवी लावल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळे पोलीसात  गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनाळ येथील मुख्य रस्त्यावर मधुकर चौगले यांनी बोलेरो गाडी क्र. (एमएच ०८ सी ६८११) आपल्या घरासमोर रहदारीस अडथळा येईल अशा धोकादायक स्थितीत लावली होती. त्यावेळी सरकारी साक्षीदार पोसई शिंदे यांनी गाडी बाजूला घेण्याविषयी आदेशीत केले होते. यावेळी आरोपीने अटकाव केला. त्यामुळे साक्षीदार आणि फिर्यादी पो.कॉ. विनायक सुतार यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मधुकर चौगले यांच्याविरोधात कळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.