कणेरीवाडीत धावत्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊस काढताना मुलगा ठार  

0
1404

गोकुळ शिरगाव (प्रतिनिधी) : उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमागे पळत जाऊन ऊस काढताना  एका मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कणेरीवाडी, दसरा चौक (ता.करवीर) येथे बुधवारी रात्री घडली. यासीन महमूद नदाफ (वय १२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कणेरीवाडी दसरा चौक येथून उसाचा ट्रॅक्टर निघाला होता. यावेळी लहान मुले ऊस काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागे पळत होती. यात यासीन महमूद नदाफ हा ऊस काढताना खाली पडला. आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोत यांनी घटनास्थळी धाव घेत यासीनला खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र, यासीनचा वाटेतच मृत्यू झाला. यासीनचे कुटुंब कर्नाटकातील आहे. त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करतात.