आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यातील कानोली (ता. आजरा) येथील ५० वर्षीय व्यक्तीचा कोल्हापुरातील सीपीआर रूग्णालयात शुक्रवारी रात्री २ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही व्यक्ती एका खासगी प्रवासी वाहनावर वाहक म्हणून काम करत होती. ४ दिवसापूर्वी ते आजारी पडले होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना गडहिंग्लज येथे उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती एकदम खालवल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे पाठविण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे.