कोल्हापुरात ‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उद्या होणाऱ्या ९८ व्या अण्णा भाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून निर्मिती विचार मंचच्या वतीने सोमनाथ कदम यांच्या विसाव्या शतकातील मातंग समाजया पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. लेखक सोमनाथ कदम यांचे हे तिसरे पुस्तक आहे.

या वेळी प्रमुख वक्ते विठ्ठलराव शिंदे यांनी भाषणातून अण्णाभाऊंचा जीवनपट उलगडला. समीक्षक प्रकाश नाईक यांनी पुस्तकातील बहुतांश माहिती ही लेखकाने सत्य परिस्थितीचा अभ्यास करून घेतल्याने हा शोधप्रबंधच असल्याचे मत मांडले. कार्यक्रमात शाहीर कबीर नाईकनवरे यांनी अण्णा भाऊंचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी लिहिलेला छक्कडहा पोवाडा सादर केला. या वेळी ज्येष्ठ सामजिक विचारवंत सुकुमार कांबळे, प्रमुख पाहुणे माजी आमदार राजीव आवळे, समीक्षक अमोल महापुरे आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन सुचित्रा कदम यांनी तर अनिल म्हमाणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

 

कला

error: कंटेंट कॉपी केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.