कोल्हापूर (प्रतिनिधी) : महावितरणच्या कोल्हापूर शहर विभाग अंतर्गत मार्केट यार्ड उपविभागामार्फत शिरोली येथील औद्योगिक वीज ग्राहकांसाठी शुक्रवारी (दि.११) संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा सकाळी ११ ते २ या वेळेत शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन भवन, श्रीराम फाऊंड्री समोर, शिरोली येथे होईल.

या संवाद मेळाव्यात औद्योगिक वीज ग्राहकांच्या वीज पुरवठा व वीज सुविधा विषयक अडचणी, महावितरणच्या ग्राहक सुविधा व सवलत योजना याविषयी चर्चा केली जाणार आहे. वीज ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले आहे.