मुंबई  (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख ‘शवसेना’ करत टीका केली होती. या टीकेला शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी ट्विटरवरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अमृताताई या दीपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नयेत . शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील “अ” मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा. आणि आपले  मानसिक स्वास्थ जपा, असा टोला लगावला आहे.

शिवसेनाच आजही रुग्णवाहिका आणि अंतिम वेळेस सगळ्यात आधी आठवते, हे देखील विसरु नका. आपल्या नावात ‘अ’ च महत्त्व आहे ते निघाले तर ‘मृता’ राहील. शिवसेनेची काळजी करु नका, आपले मानसिक स्वास्थ जपा. ‘अ’ मंगल विचार मनात आणणे ‘अ’योग्य बरे का”, अशी खरमरीत टीकाही गोऱ्हे यांनी केली आहे.