नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या वर्षी बकऱ्यांशिवाय बकरी ईद साजरी केली जाईल त्याच वर्षी फटक्यांशिवाय दिवाळी साजरी केली जाईल. जर देशामध्ये बकऱ्याशिवाय बकरी ईद साजरी झाली तर दिवाळीमध्येही फटाके फोडले जाणार नाही,  असे उत्तर प्रदेशमधील उन्नावचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी म्हटले आहे.

साक्षी महाराज यांनी दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यावरुन फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्टवरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सध्या फेसबुकवर फटक्यांमुळे दिवाळीमध्ये होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर साक्षी महाराज यांनी विधान केले  आहे. ज्या दिवशी बकरीशिवाय बकरी ईद साजरी होईल, त्या दिवशीच फटक्यांशिवाय दिवाळी सुद्धा साजरी केली जाईल. प्रदुषणाच्या नावाखाली फटक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजाळू नका, असे त्यांनी म्हटले आहे.