मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाने जगातील सर्वच व्यक्तींना ग्रासले आहे. यामध्ये सामान्य जनतेसोबतच नेतेमंडळींचा देखील समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त होते. पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असून ते कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे. याबद्दलची माहिती अजित पवार यांनी स्वतः ट्विट करुन दिली.

अतिवृष्टीच्या काळात फटका बसलेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते दौरे करत होते. याच दरम्यान त्यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवल्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यानंतर खबरादारीचा उपाय म्हणून त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. आता उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले असून रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.