नागपूर (प्रतिनिधी) : ट्वीट करत ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना पेन्ग्विन, असे म्हटल्याप्रकरणी समित ठक्करला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे.

२४ ऑक्टोबर रोजी नागपूर पोलिसांनी समित ठक्करला राजकोट मधून ताब्यात घेऊन त्याला २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले होते. त्याला न्यायालयाने  ५ दिवसांची कोठडी सुनावली होती. आता त्याची मुदत संपल्यावर शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा समीतला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी समित ठक्कर याच्या विरोधात तक्रार केली होती. आरोपी ३२ वर्षीय समित हा भाजपचा आयटी सेलचा कार्यकर्ता  असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.