कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने इथेनॉलच्या खरेदी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे साखर उद्योगामार्फत अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने साखर उद्योगाला आर्थिक दिलासा देण्यासाठी  इथेनॉल निर्मितीला चालना देणेचे धोरण यापूर्वी जाहीर केले होते. आज इथेनॉल खरेदीच्या दरात भरीव वाढ केली आहे. त्यामुळे साखर कारखाने आता साखर निर्मितीबरोबर इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देतील. इथेनॉल निर्मितीतून साखर   उद्योगासमोरील साखर साठ्याचे संकट कमी होईल. व इथेनॉल विक्रीतून साखर कारखान्यास आर्थिक फायदा होईल.