कोल्हापूर (प्रतिनिधी) : खाजगी सावकारीतील पैशाच्या वसुलीच्या रागातून सराफ संघाच्या अध्यक्षाने हॉटेल व्यावसायिकावर चाकूहल्ला केला. यात वल्लभ राजेंद्र जामसांडेकर (वय ३३, रा. राजारामपुरी पहिली गल्ली) हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी त्यांनी कुलदीप गायकवाड (वय ३५, रा. महालक्ष्मीनगर) याच्याविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

वल्लभ जामसांडेकर याने हॉटेल व्यवसायासाठी कुलदीप गायकवाड यांच्याकडून डिसेंबर २०१९ मध्ये ७ टक्के व्याजदराने चार लाख रुपये घेतले होते. त्याचे व्याज म्हणून ८० हजार रुपये त्यांनी कुलदीप गायकवाड याला परत दिले होते. लॉकडाऊनमुळे या रकमेतील मुद्दल व व्याज थकीत राहिले होते. या पैशाची मागणी करण्यासाठी कुलदीप गायकवाड हा मंगळवारी रात्री वल्लभ जामसांडेकर याच्या राजारामपुरी पहिली गल्लीतील हॉटेलमध्ये आला, त्याने पैशाची मागणी केली. यानंतर त्या दोघांत वाद झाला. त्यातून संतप्त झालेल्या गायकवाड याने जामसांडेकर याला बेदम मारहाण करून चाकूहल्ला केला. यामध्ये जामसांडेकर गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायकवाड हा फरार झाला आहे.