कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाचा आज (गुरुवार) सहावा दिवस. आज करवीरनिवासिनी श्री अंबामातेची ‘काशीविश्वेश्वरांना दर्शन’ स्वरूपात महापूजा बांधण्यात आली.

करवीर क्षेत्रात असलेले दशाश्वमेध तीर्थ व त्यांचे महत्त्व श्रीशिव पार्वतीला सांगतात व उमेसह करवीरक्षेत्री राहण्यासाठी क्षेत्रदेवतेची म्हणजेच श्री महालक्ष्मीची स्तुती करून परवानगी मागतात. तेव्हा श्री महालक्ष्मी श्री शिवाला तिच्या उजव्या हाताच्या दिशेला वास करण्यास व येथील प्रत्येक जीवास अंती तारकमंत्राचा उपदेश करण्यास सांगते. यास्तव करवीराला काशीचा दर्जा आहे. स्वत: करवीरनिवासिनी करवीर माहात्म्यात सांगते की, जे काशीविश्वेश्वराचे व महालक्ष्मीचे नित्य दर्शन घेतात, त्यांचे दर्शन सफल होते.

श्री पूजक मकरंद मुनीश्वर आणि माधव मुनीश्वर यांनी ही महापूजा बांधली.