कोल्हापूर (प्रतिनिधी) : शाळांनी केलेली मनमानी फी वाढ, फी वसुलीची अयोग्य पद्धतीसंबंधी तक्रारी करण्यासाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. २३१-२५४३२८३ हा दूरध्वनी तसेच ९९६०८५९७९७ आणि ९८५०४९९९२८ हे मोबाईल नंबरवर सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत सुरु करण्यात आले आहेत. भारतीय जनता पार्टीतर्फे केलेल्या पाठपुराव्यामुळे हेल्पलाईन सुरू करावे लागले आहेत. 

विनाअनुदानीत शाळांचे मागील ५ वर्षापासूनचे ऑडीट करावे, फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हे दाखल करून शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनीही वेळोवेळी यासंबंधी पाठपुरावा केला. त्यामुळे प्रशासनाकडून हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. संबंधित पालकांनी हेल्पलाईनवर तक्रारी करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.