जोतिबा (प्रतिनिधी) : जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा जोतिबा देवाची नवरात्री उत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आज (मंगळवार) सकाळी सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा तसेच आदिमाता श्री चोपडाई देवीची अलंकारिक सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली.

श्री जोतिबा यांची पूजा पुजारी सरदार सांगळे, गणेश बुणे, दगडू भंडारी, गजानन लादे, यांनी साकारली.