बांधकामावरील शेडचा दरवाजा उचकटून ९१ हजारांची रोकड लंपास

0
88

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुईखडी परिसरात सुरू असणाऱ्या बांधकामावरील पत्र्याच्या शेडचा दरवाजा उचकटून  चोरट्यांनी ९१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी संजय रामेश्वर प्रजापती (वय २९, मूळ रा. पलूस झारखंड, सध्या रा. पुईखडी) याने करवीर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुईखडी येथील एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी संजय प्रजापती काम करतात. याठिकाणी असलेल्या शेडमध्येच ते राहतात. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या शेडचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी आतील ९१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि एक मोबाइल हँडसेट लंपास केला. सकाळी हा चोरीचा प्रकार संजय प्रजापती यांच्या निदर्शनास आला. याप्रकरणी त्यांनी चोरट्यांच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.