राधानगरी तालुक्यात सरासरी ९० टक्के मतदान…

0
136

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्‍यात सरासरी ९० टक्के मतदानाची नोंद झाली. तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी राजापूर या गावात ९६.७० टक्के इतके उच्चांकी मतदानाची नोंद झाली. तर सावडे पैकी वडाचीवाडी या गावांमधील सर्वात कमी ७०.५९ टक्के इतकी कमी मतदानाची नोंद झाली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्याबरोबरच कोरोना काळानंतर ही ग्रामीण भागातील ही पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. कार्यकर्त्यांना आता निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. तर महसूल खात्याकडून योग्य ती काळजी घेतली गेली होती.