टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात ९ कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. यामुळे मेंढपाळांचे सुमारे पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाले आहे.

गावाच्या पूर्वेस वेताळमाळ नजीक असलेल्या शेतात सोमा अन्नाप्पा सिसाळ व सहकाऱ्यांच्या  बकऱ्यांचा तळ बसला आहे. नेहमीप्रमाणे मेंढपाळ लहान पिल्ले डालग्यात (जाळी) ठेवून मेंढ्यांचा कळप चारण्यासाठी घेवून गेले होते. अज्ञात प्राण्यांनी डालग्यातून पिल्ले बाहेर काढून त्यांचा फडशा पाडला आहे. अर्धवट फाडून टाकलेली पिल्ले, रक्त, मांस याचा घटनास्थळी सडा पडला होता.