जयसिंगपूर (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामध्ये विविध खात्यांतर्गत विकास योजना राबविण्यासाठी जवळपास ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.  

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी, यामध्ये जिल्हा नियोजन समितीकडून जनसुविधा, नागरी सुविधा आणि क वर्ग तिर्थस्थळांसाठी ३ कोटी ५० लाख रुपये, आमदार स्थानिक विकास निधी ३ कोटी, जिल्हा नियोजन समितीकडून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकासासाठी १ कोटी, ३०५४ योजनेमधून १ कोटी,  खिद्रापूर येथील उर्दू शाळेच्या नव्याने तीन खोल्या बांधकामासाठी २५ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मंजूर झालेल्या जवळपास ९ कोटींच्या निधीमधून शिरोळ तालुक्यातील बहुतांश गावे आणि सर्व घटकांना निधीचा विनियोग केला जाणार आहे.

तसेच शासनाच्या विविध योजनांमधून शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या पुढच्या काळात सुद्धा विकास निधी खेचून आणण्याचा हा स्त्रोत कायम राखला जाईल. यातून शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास केला जाईल असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी म्हटले आहे.