जिल्ह्यात मागील चोवीस तासात ८४ जण कोरोनाबाधित; ७२८ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ८४ जणांचे कोरोना अहवाल आले आहेत. तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ७२८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७७३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २८, आजरा तालुक्यातील ३, भूदरगड तालुक्यातील ४, चंदगड तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ७,  करवीर तालुक्यातील १६,    पन्हाळा तालुक्यातील १,  शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १४ आणि इतर जिल्ह्यातील ८ अशा एकूण जणांना कोरोनाची लागण ८४ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ७२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान कोल्हापूर शहरातील १, करवीर तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १ आणि सांगोला जिल्ह्यातील १ अशा ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या : ४७,२११

एकूण डिस्चार्ज मिळालेले : ४२,८६५

उपचारासाठी दाखल रुग्ण : २७५८

एकूण मृत्यू झालेले : १५८८

Live Marathi News

Recent Posts

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेचा कॅन्सरग्रस्तांना मदतीचा हात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु…

10 hours ago