कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाची बैठक आज (मंगळवार) आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्यासमवेत पार पडली. दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी यांना वेतन तात्काळ देण्यात यावे, वर्ग चार आणि तीन मधील कर्मचारी यांना सण तसलमात देण्यात यावी, १५३ सन २००४ मधील कायम झालेल्या कर्मचारी यांना २० हजार रुपये फरक देण्यात यावा,हंगामी कर्मचारी यांना तसलमात देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत आयुक्त यांनी ८ हजार तसलमात देण्याचे मान्य केले. आरोग्य आणि ड्रेनेजकडील रोजंदारी कर्मचारी यांचा वेतन फरक देण्याचे मान्य केले, १५३ मधील कर्मचारी यांना देय फरका पोटी २० हजार देणे, तसेच या महिन्याचे वेतन दि. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी आदा करावे, अशा मागण्या मान्य करताना अन्य मागणी संदर्भात मनपाची आर्थिक परिस्थिती बघून निर्णय घेत आहोत, असे आश्वासन दिले. या बैठकीस महानगरपालिका अति. आयुक्त नितीन देसाई, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड उपस्थित होते.

बैठकीला कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, जनरल सेक्रेटरी दिनकर आवळे, अजित तिवले यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.